बीड प्रतिनिधी. गुलशेर शेख
विद्यार्थ्यांना हवी असते शाबासकीची एक थाप या हेतूने वर्ग दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभाचे आयोजन दुसरबीड येथील गीतांजली मंगल कार्यालयात २८ मे रोजी करण्यात आले होते.यावेळी अध्यक्ष स्थानी उपस्थित विद्यार्थ्यांमधून ९५.६०% गुण मिळवलेला ताडशिवणी येथील अमर अनिल शिंदे याची निवड करण्यात आली तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसुती तज्ज्ञ डॉ.डी एस शिंदे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून महेशजी पेंडके,संदीप जाधव व एम आर गायकवाड हे होते.
डॉ.डी एस शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वतःचे दाखले देत अभ्यास कसा करावा व स्पर्धात्मक युगात कसे टिकून राहावे या विषयी सखोल मार्गदर्शन केले. सत्कारा साठी ८५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म द्वारे ऑनलाईन माहिती मागवली होती व ३३ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली होती यावेळी अमर अनिल शिंदे ९५.६०% सायली दीपक खरात ९४% निदा तबस्सुम रईस अहमद अन्सारी ९२.२०% काजल रामेश्वर जायभाये ९१.४०% संघदीप समाधान तायडे ९०% लक्ष्मी दादाराव पाटोळे ८९.२०% सानिका देवानंद डोळे ८८.२०% धनश्री विष्णू ढगे ८८.२०% कोमल सर्जेराव इनकर ८७.६०% सानिका समाधान शेजुळ ८७.६०% पुनम एकनाथ खरात ८७.४०% किरण मधुकर भोसले ८७.२०% कार्तिक विठ्ठल राजळे ८७.२०% मैथिली नंदकिशोर चव्हाण ८७% स्नेहा सुधाकर भागडे ८६.४०% अंजली संजय शिंदे ८६.४०% करण रमेश पठ्ठे ८६.२०% सानिका विलास सोनकांबळे ८६.२०% गौरी रमेश कोंडाणे ८५% गजानन सुरेश खरुळे ८५% मदीहा समीर शेख ८३% या विद्यार्थ्यांना आई-वडिलांसह पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले,तर काही विद्यार्थ्यांचे पालक कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या अकरा वर्षापासून कै.तुकाराम कायंदे
विद्यालय रूम्हणा येथील शिक्षक उध्दव गवई हे करीत आहेत.




Post a Comment
0 Comments