Type Here to Get Search Results !

मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो प्लाट परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने.वेगावर लगाम नाही अपघातात तरुण शेतकरी ठार

 वेगावर लगाम नाही; अपघातात तरुण शेतकरी ठार.

मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो प्लाट परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत कैलास भीमराव तिडके (वय ३०, रा. रसलपूर पायटांगी) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २२ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.


अपघातग्रस्त कैलास तिडके यांना जय गजानन आपात्कालीन पथकाने तत्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथे उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले. अपघातावेळी घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल मनिष मालठाणे (ब.नं. 1697) आणि पोहेका प्रमोद नवलकार (ब.नं. 578) उपस्थित होते.


फिर्यादी शेषराव कीसनराव तिडके यांच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप. क्र. 182/25, कलम 281, 106(1) BNS 2023 सह कलम 184 मोटार वाहन कायद्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुसज्ज रस्ते असूनही वाहनचालकांवर वेगाचा लगाम नाही, वाहतूक शिस्त हरवत चालल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये आहे. विशेषतः दुचाकीस्वार हेल्मेट न घालता प्रवास करत असल्याने अशा अपघातांमध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.



आशिष वानखडे अकोला जिल्हा उपसंपादक

Post a Comment

0 Comments