Type Here to Get Search Results !

महापुरुषांचा अपमान थांबवा, फुले चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करा

 *महापुरुषांचा अपमान थांबवा,फुले चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करा* 

 *मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे फुले प्रेमींचा सेन्सॉर बोर्ड विरुद्ध एल्गार...*

   

  महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने १२ बदलांचे नोटीस काढलेत! का? कारण त्यात जात,मनू,मांग, महार,शुद्र,पेशवाई अशा शब्दांचा उल्लेख आहे.सावित्रीमाईंच्या अंगावर शेण फेकण्याचा ऐतिहासिक सत्यप्रसंग दाखवलाय.“तुमचे हातपाय वेगळे केले असते” हा क्रांतिकारी संवाद आहे.असे आयोजकांनी सांगितले. ‘फुले’ चित्रपट म्हणजे ब्राह्मणांच्या विरोधात नसून तो ब्राह्मणीवादी विचारांच्या विरोधावर आधारित आहे...! असे ॲड नाझेर काझी यांनी सांगितले. 

हेच सेन्सॉर बोर्ड काश्मीर फाईल्स आणि केरळा स्टोरी सारख्या द्वेषमूलक खोट्या चित्रपटांना जसेच्यातसे मान्य करतो पण फुले चित्रपटाला कात्री लावतो.हे फक्त चित्रपटाचं सेन्सॉरिंग नाही तर हे फुलेंच्या विचाराचा,बहुजनांच्या इतिहासाचा वआमच्या अस्मितेचा अपमान आहे!असे बामसेफचे तालुका अध्यक्ष डॉ भिमराव म्हस्के यांनी सांगितले.या देशात अजूनही पेशवाईचे विचार आणि मनूचे पुत्र सेन्सॉर बोर्डात बसलेत हेच दुर्दैव आहे.या बोर्डाच्या सर्व मनुवादी सदस्यांची तात्काळ हकालपट्टी झालीच पाहिजे!त्यांच्या डोक्यात फक्त वर्णव्यवस्था आहे,संविधान नाही! आम्ही महात्मा फुले व सावित्रीमाईंची लेकरे आहोत त्यांच्यावर चिखल शेन व दगड गोटे फेकणाऱ्यांची कपटी औलाद नाही.असे उपस्थित महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले.प्रसंगी निवेदनकर्त्यांनी मोठमोठ्याने घोषणा दिल्या.*" महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांचा विजय असो,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,भारतीय संविधानाचा विजय असो,फुले चित्रपटाला विरोध करणारांचा जाहिर निषेध...! जाहिर निषेध...!! , चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करावा "*  

   निवेदन देण्यासाठी सिंदखेड राजा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री.देविदास ठाकरे,माजी न प अध्यक्ष ॲड श्री.नाझेर काझी,माजी न प अध्यक्ष श्री.विष्णू मेहेत्रे,माजी न प उपाध्यक्ष श्री.प्रकाश मेहेत्रे,राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री.दिलीप चौधरी,माजी नगरसेवक सेवक,सावता परिषद जिल्हा अध्यक्ष श्री.श्याम मेहेत्रे,माजी नगरसेवक श्री.नरहरी तायडे,माजी नगरसेवक श्री.राजेश आंभोरे,माळी समाज अधिकारी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रकाश आढाव,बामसेफ तालुकाध्यक्ष श्री.डाॅ.भिमराव म्हस्के,युवा नेतृत्व श्री.सिध्दार्थ जाधव,श्री.वैभव मिनासे,श्री.सागर मेहेत्रे,श्री.उमेश खरात,व्यावसायिक श्री.अमोल जगन ठाकरे,श्री.त्र्यबंक मगर,श्री.प्रल्हाद माने,श्री.बाबासाहेब बनसोड,श्री.समाधान बबनराव घुगे,श्री.अर्जुन आसाराम काकडे,श्री.साहेबराव जावळे,ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ तालुकाध्यक्ष श्री.नंदकिशोर खरात,श्री. डी.बी.खरात,ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजय ठाकरे, फुले शाहु आंबेडकर विचारमंचाचे श्री.सिध्दार्थ म्हस्के,श्री.हरिदास सोनुने, खरात,वनश्री जनाबापू मेहेत्रे,श्री.नामदेव राठोड(मंत्री),श्री.अमोल खरात,श्री.चंद्रकांत शंकर बनसोड,श्री.दत्तात्रय खरात,श्री.एकनाथ मेहेत्रे,श्री.गणेश रुस्तुम मोरे,श्री.संतोष पाडमुख, श्री.सरकटे,श्री.जाधव व बहुसंख्य शहरवासी उपस्थित होते.शेवटी राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा जि.अ अध्यक्ष मौर्य आकाश मेहेत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments