*खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे गोठ्यातून दोन गायींची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
खामगाव :- तालुक्यातील पिंप्री गवळी येथे अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातील दोन गायी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम भास्कर गासे (वय २३) रा. पिंप्री गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ मार्चच्या रात्री ८ वाजल्यापासून २६ मार्चच्या सकाळी ७ वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोठ्यातील दोन गायी चोरल्या. घटनेची माहिती मिळताच शुभम गासे यांनी २७ मार्च रोजी दुपारी १२:४२ वाजता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस हवालदार संजय काकडे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस हवालदार संजय इंगळे करीत आहेत.
दरम्यान, परिसरात अशा चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
*⭕नारी शक्ती न्यूज, क्राईम अपडेट चॅनल ⭕*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
➖➖➖➖➖➖➖➖
*बातमी आणि जाहिरातसाठी*
*संपर्क करा -
मुख्य संपादक ...
श्रीमती उमाताई बोचरे
मो.9822146155
उप संपादक ...
सोपान पाटील

Post a Comment
0 Comments