ग्रेट भेट -एका ग्रेट अधिकाऱ्याची
आज दिनांक 27 मार्च 2025 रोजी झाडेगाव येथील विद्यामंदिरास विद्वत्तेचे धनी असलेले बुलढाणा जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी माननीय डॉ. श्री. किरण पाटील साहेब यांनी भेट दिली. शाळेतील शिस्त,स्वच्छता, आनंदमयी व निसर्गरम्य वातावरण पाहून प्रवेश करता क्षणी साहेबांच्या मुखातून शाळेबद्दल गौरवोद्गार उमटले. एवढ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या तोंडून असे कौतुक ऐकण्याचा आनंद तर अवर्णनीयच आहे. शाळेतील सर्व वर्गात अध्यापनाचे काम सुरळीतपणे चालू असल्याचे पाहून, शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आणि त्यांना भेटून साहेबांच्या ही चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले . शाळेतील विविध कामांचा आणि राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. शाळेतर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन साहेबांचा सत्कार करण्यात आला. भेटी वेळी साहेबांनी शालेय सौंदर्यात भर टाकण्याकरिता "शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांना स्वतः रंगवू द्या, त्यांना त्यांच्यातील कलेचा अविष्कार करू द्या." असे अद्वितीय आणि अमूल्य मार्गदर्शन केले. या वरून आपल्याला साहेबांना विद्यार्थ्यांबद्दल असलेल्या आत्मीयतेची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
शालेय परिसरातील दोन्ही अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन तेथील विविध योजना, उपक्रमांचा आढावा घेतला. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची स्वतः चव घेत त्याच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना उचलून घेत स्वतः त्यांची वजन व उंची घेऊन योग्य नोंदी घेत असल्याबाबत साहेबांनी समाधान व्यक्त केले.
भेटीदरम्यान दिव्यांग बालकाच्या पालकांना भेटून पुढील संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याकरिता संबंधित कार्यालयांना सुचित करण्यात आले.
आरोग्य उप केंद्राला भेट देऊन तेथे राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला.
भेटीवेळी उपविभागीय अधिकारी मा.काळेसाहेब, तहसीलदार मा. पाटील साहेब, मा. उपविभागीय अभियंता साहेब, मा. गटविकास अधिकारी श्री. मोरे साहेब, मा. गटशिक्षणाधिकारी श्री.फंड साहेब, खांडवी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. हागे सर व इतर अधिकारी वर्ग तसेच सरपच तथा शाळसमिती अध्यक्ष तथा पोलिस पाटिल सारंग खाडपे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तायडे उपस्थित होते



Post a Comment
0 Comments