Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यशाळेत प्रकाश खंडागळे यांचा सन्मान*

 *अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यशाळेत प्रकाश खंडागळे यांचा सन्मान*

*बुलढाणा संपादक*


आसलगाव येथे कार्यशाळेचे आयोजन; संघटनेच्या कार्याची माहिती देत पदाधिकाऱ्यांचा गौरव


आसलगाव, ता. जळगाव जामोद — अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने आसलगाव येथे दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा अहिल्याबाई होळकर सभागृह, आसलगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.


यावेळी संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर तसेच संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. संघटनेची उद्दिष्टे, पत्रकारांचे हक्क व कर्तव्ये आणि पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश खंडागळे यांना संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.


या सन्मानामुळे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला असून, संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


कार्यशाळेस संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments