Type Here to Get Search Results !

वाहतूक नियंत्रण शाखेची अवैध गोमास वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई.

ऑपरेशन प्रहार  अंतर्गत जिल्हा   वाहतूक नियंत्रण शाखा ची अवैध गोमास वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई.


आज दि : २०/०९/२०२६ रोजी मा पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक सर यांच्या आदेशानवये वाशीम बाय पास येथे नाकाबंदी नेमलेली असताना जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील  यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीला बातमी मिळाली की काही इसम एक बुलेरो वाहनाने पातूर ते अकोला अवैधरीत्या गोमासाची वाहतूक करीत आहे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी वाहतूक शाखेतील अमलदार यांच्यासह वाशिम बायपास येथे नाकाबंदी केली असता पांढऱ्या रंगाचा एक बोलेरो वाहन संशयितरित्या पातुर ते अकोला येताना दिसला सदर वाहन झायलो न MH30AA1999 याची तपासणी केली असता वाहनातून चार इसम १) अब्दुल कलीम अब्दुल कदीर २) अब्दुल आदिल अब्दुल आवेज ३) आमिर खान जुबेर खान ४) सरदार खान कासम खान हे चार चाकी बोलेरो वाहनाने अवैधरित्या  गोमासाची वाहतूक करताना मिळून आले

 त्यांच्याकडून एक बोलेरो वाहन किंमत ७,००, ०००रु 

चार मोबाईल किंमत 80,000 हजार रुपये व एक क्विंटल गोमास किंमत अंदाजे ३०,०००  रुपये असा एकूण 8,10.000 रु मुद्देमाल मिळून   आला असून त्यांना जुने शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील कार्यवाही करिता देण्यात आले आहे

*सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , साहेब अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी साहेब उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब व एसआय राधेश्याम पटेल , हेड कॉन्स्टेबल मनोजसिंग ठाकूर  , पोलीस कॉन्स्टेबल महेश पाचपिल्ले , योगेश चौधरी , विकास गोलोकार , रिषभ शर्मा व इतर त्यांचे सहकाऱ्यांनी केली

Post a Comment

0 Comments