*नांदूरा पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चोरांचा धुमाकूळ*?
अवधा परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांनी ग्रामस्थांमध्ये संताप; रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
नांदुरा तालुका : सोपान पाटील
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील अवधा खुर्द-बुद्रुक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची ग्रामस्थांची तक्रार असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदुरा तसेच मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटी व इतर परिसरातही चोरीच्या घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून रात्रीची गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना पुरेशा प्रमाणात होत आहेत का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.गावातील तरुण वर्ग व नागरिक रात्रभर गस्त करत आहेत
🔴 अवधा परिसर पोलिसांच्या रडारवर येणार का?
गावातील प्रमुख रस्ते, चौक आणि प्रवेशद्वारांवर रात्रीच्या वेळी नियमित पोलीस गस्त वाढवावी. संशयास्पद व्यक्ती व वाहनांची तपासणी करावी आणि यापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास वेगाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
🔴 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची तयारी
स्थानिक पातळीवर अपेक्षित कारवाई होत नसल्याची ग्रामस्थांची भावना कायम राहिल्यास, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सामूहिक निवेदन देण्याची मागणी होत आहे.
🔴 ग्रामपंचायतीनेही सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी
गावातील प्रमुख प्रवेशद्वार व संवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे बसविणे, स्ट्रीट लाईट सुरू ठेवणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षा जनजागृती करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अवधा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Post a Comment
0 Comments